गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (12:12 IST)

Pune: पुणे हादरलं, मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून खून

murder
पुण्यात गुन्हेगारीत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी मध्यरात्री खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचा गोळ्या झाडून खून केल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अनिल साहू (35)असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. 

मृत अनिल साहू हे घोरपडे पेठेत सिंहगड गँरेज चौक परिसरात राहत होते. रविवारी मध्यरात्री ते गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्ती घरात शिरला आणि त्याने साहू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. अज्ञाताने हा हल्ला त्यांच्या कुटुंबियांच्या समोर केला आणि पसार झाले. गोळ्या झाडल्यामुळे साहू हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. 
 
पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळतातच  खडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी  खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. अनिल साहू यांचा खून का केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit