राज ठाकरेंची पुण्यात रणधुमाळी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या पुण्यात 'रणधुमाळी' सुरू आहे. आज १३ जानेवारी २०२६ हा प्रचाराचा शेवटचा दिवस असून, राज ठाकरे पुण्यात तळ ठोकून आहे.
तसेच राज ठाकरे यांनी आपल्या पुणे दौऱ्यात पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येवर आणि नियोजनाच्या अभावावर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. "ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होत आहे आणि सोयीसुविधांवर ताण येत आहे, ते पाहता पुणे लवकरात लवकर बरबाद होईल," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे विधान सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "मी विकासाच्या विरोधात नाही, पण एकाच उद्योगपतीची (अदानी समूह) सर्व क्षेत्रांत निर्माण होणारी मक्तेदारी देशासाठी घातक आहे." सिमेंटपासून स्टीलपर्यंत सर्व प्रकल्प एकाच हातांत जाण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला.
तसेच आज संध्याकाळी ५-६ वाजेच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात विविध भागांत भेटी देऊन उमेदवारांना बळ देत आहे. त्यांनी पुण्यातील महत्त्वाच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मतदारांना "बदल घडवण्यासाठी" मतदान करण्याचे आवाहन केले.
Edited By- Dhanashri Naik