मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :दौंड , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (14:48 IST)

अपघातात बहिण-भावाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-सांगली महामार्गावरील सोनवडी गावच्या हद्दीत आज दुपारी  पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव अनुष्का गणेश शिंदे, आदित्य गणेश शिंदे असं आहे.
 
अनुष्का आणि आदित्य नेहमीप्रमाणे दोघेही आपल्या स्कुटीवरून शाळेत चालले होते. मनमाड-सांगली महामार्गावर सोनवडी गावजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप व्हॅनने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कुटीचा पुर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर पिकअपचा ड्रायव्हर पळून गेला. बहिण भावांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांत पिकअप व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत आहे.