बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : गुरूवार, 31 मार्च 2022 (16:32 IST)

Chaitra gaur decoration : चैत्र गौरी सजावट

चैत्र. शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, नानाप्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून आरास करतात. 
 
असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र शु . तृतीयेला गौरी तृतिया साजरी होते. या दिवशी गौरीची पूजा करून तिला लाकडी किंवा पितळी हिंदोळ्यावर बसविली जाते व नंतर तिला गाणी म्हणत झोके देतात. काही ठिकाणी या पुजेस दोलोत्सव असेही म्हणतात आणि तो अक्षय्य तृतीयेपर्यंत चालू असतो.
 
तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी ही माहेरी येते अशी समजूत आहे. विषम संख्यांच्या पायर्‍यांवर देवीची आरास मांडण्यात येते. गौरीचा पाळणा बसवून त्याभोवती सोयीप्रमाणे विविध फळं, फराळ, गोड पदार्थ आणि खिरापतीचा (सुके खोबरे आणि साखर) नैवेघ दाखवला जातो. हौसेप्रमाणे देवीच्याभोवती सुवासिक फुलांची किंवा आर्कषक झाडांची कुंडी मांडली जाते. महाराष्ट्रात तर गौरीचे हळदी-कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी आरास मांडली जाते. हौसेप्रमाणे देवीच्याभोवती सुवासिक फुलांची किंवा आर्कषक झाडांची कुंडी मांडली जाते.या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे.