सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (10:57 IST)

Rang Panchami 2022:आज रंगपंचमी, जाणून घ्या हा सण कसा, कुठे आणि का साजरा केला जातो

हिंदू धर्मात होळीनंतर रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी रंगपंचमी 22 मार्च मंगळवारला आहे.होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.होळीचा सण  फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होतो आणि पंचमी तिथीपर्यंत चालतो. पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते म्हणून तिला रंगपंचमी म्हणतात.
 
रंगपंचमीचा सण मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या काही भागांमध्ये साजरा केला जातो. असे म्हटले जाते की रंगपंचमीच्या दिवशी दैवी शक्ती नकारात्मक शक्तींवर मात करतात. या दिवशी राधारानी मंदिरात विशेष पूजा आणि दर्शन केल्यास लाभ होतो. असे मानले जाते की या दिवशी श्रीकृष्णाने गोपींसोबत रंगांची उधळण करत रासलीला केली आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याचा उत्सव साजरा केला.
 
रंगपंचमी कशी साजरी करावी-
1. या दिवशी लोक अबीर-गुलाल लावून एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात.
2. या दिवशी राधा-कृष्णाला अबीर-गुलालही अर्पण केला जातो.
3. या दिवशी मिरवणूक  काढली जाते.
 
रंगपंचमीचे महत्त्व-
 
पौराणिक कथेनुसार, रंगपंचमीचा दिवस देवी-देवतांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की या दिवशी रंगांचा वापर केल्याने जगात सकारात्मक ऊर्जा पसरते. असे मानले जाते की या दिवशी एकमेकांना लावलेले रंग उधळतात. असे केल्याने देवता आकर्षित होतात आणि आशीर्वाद देतात.