गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2024 (12:03 IST)

वरिष्ठ पत्रकार पंकज केळकर यांचे निधन

death
पुण्यातील वरिष्ठ पत्रकार पंकज केळकर यांचे 11 मार्च रोजी पुण्यात हृदयविकाराने निधन झाले.ते आज ताक आणि इंडिया टुडे या वृत्तवाहिनी मध्ये पुण्याचे प्रतिनिधी म्हणून कामाला होते. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना औंध येथे राहत्या स्थानी हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्राण ज्योती मालवली. 

मूळचे अकोलाचे पंकज केळकर गेल्या 20-22 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. गेल्या 18 वर्षपासून त्यांनी पुणे प्रतिनिधी म्हणून आजतक मध्ये काम केले. तसेच ते इंडिया टुडे या ग्रुप मध्ये असोसिएट एडिटर तसेच पुणे ब्युरो म्हणून काम बघत होते. त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्यांचा मुलगा परदेशात  राहतो. त्याच्या आल्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.  
 
 Edited by - Priya Dixit