शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून, ते डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनाआज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून सतत खोकल्याचा त्रास आणि छातीत दुखणे जाणवत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सर्व आरोग्य चाचण्यांचे अहवाल पूर्णपणे सामान्य आणि स्थिर आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच गेल्या २-३ दिवसांपासून त्यांना सतत खोकल्याचा त्रास होत होता. तसेच ते दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर होते, ज्यामुळे थकवा आणि अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि देखरेखीसाठी त्यांना दाखल केले आहे.
तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांचा पुढील ३ दिवसांचा करमाळा (सोलापूर) आणि धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळी दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. तर डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयातच राहून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.

