शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (08:03 IST)

पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्टसर्किट; चार्जिंगला लावलेल्या “इतक्या” बाइक जळून खाक

fire on tab
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या घटनेत 15 इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाल्या आहेत. शहरातील तळवडे भागात त्रिवेणी हौसिंग सोसायटी येथे शॉर्टसर्किटने आग लागली. यात 15 बाइक जळून खाक झाल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. तसेच, पहिल्या मजल्यावरील चार जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
 
पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाइक चार्जिंगला लावली होती. तिथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे अग्निशमन जवानाकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील त्रिवेणीनगर येथे त्रिवेणी हौसिंग सोसायटी या ठिकाणी पार्किंगमध्ये शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटनंतर चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक बाइकला आग लागली. यात एकूण 15 इलेक्ट्रिक बाइक जळून खाक झाल्या आहेत.
 
याबाबतची माहिती तळवडे अग्निशमन विभागाला मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, भीषण आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात तीन मुलांसह 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अग्निशमन विभागाचे मुकेश बर्वे, प्रतीक कांबळे, प्रदीप हिले, गोविंद सरवदे, दिनेश इंगलकर, अशोक पिंपरे आदींनी आगीवर नियंत्रण मिळवले.
Edited by : Ratnadeep Ranshoor