1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Six people raped a 20-year-old girl from time to time

२० वर्षीय तरुणीची अश्लील चित्रफीत काढून सहा जणांचा वेळोवेळी बलात्कार

पुण्यातील देहूरोड वीस वर्षीय तरुणीचा अश्लील व्हिडिओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करत तिच्यावर सहा जणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार असह्य झाल्यामुळे पीडितेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. देहूरोड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
 
मोमीन उर्फ अरबाज जावेद खान (वय २१), सुलतान उर्फ मुस्ताक सलीम सय्यद (वय ३२), रियाज उर्फ मन्नन जावेद खान (वय १९, सर्व रा. शितळादेवी मंदिराजवळ, शितळानगर नंबर १, देहूरोड ) आणि सोहेल शेरअली पिरजादे ( वय २१, रा. आंबेडकर नगर देहूरोड ) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांपैकी एक जण शहरातील राजकीय नेत्याचा मुलगा आहे. 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीशी मोमीनचे प्रेमसंबंध होते. त्यांच्यातील संबंधांचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला होता. मोमीनचा मित्र मुस्ताकने हा व्हिडीओ पीडितेला दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने हा व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविला. त्यांनीही वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार केले. गेले पाच महिने शितळा नगर स्मशानभूमी जवळच्या मैदानात संशयिताच्या मोटारीत आणि शितळानगर येथील जनावरांच्या गोठ्यात सुरू होता. त्रास असह्य होऊ लागल्याने पीडित तरुणीने मंगळवारी देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना आपबीती सांगितली. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, आयटी ॲक्ट आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील लेख
रुग्णाच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल