शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (13:02 IST)

म्हणून छोट्या भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला, हडपसरातील घटना

पुण्याच्या हडपसर परिसरात काल सकाळी बाबू  उर्फ शिवाजी गवळी(23) या तरुणाचा मृतदेह सापडला .या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना समजले की या तरुणाचा खून त्याच्या सक्ख्या मोठ्या भावानेच केला. वारंवार पैसे मागत असल्याने मोठ्या भावानेच छोट्या भावाचा झोपेतच पंख्याच्या पात्याने गळा चिरून खून केला.

या प्रकरणाचा मुख्य आरोपी मनोज शिवाजी गवळी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचे हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून आरोपी मनोज याच्या वर खून केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि मनोज हे दोघे भाऊ हडपसर या परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहायचे. प्रदीप हा रिक्षा चालवायचा तर मनोज हा खाजगी बसेस साठी काम करायचा. मनोज हा विवाहित असून आपल्या पत्नीसह राहायचा आणि  प्रदीप त्यांच्याच सोबत राहत होता हे मनोजच्या पत्नीला आवडत नसे या वरून दोघांचे भांडण व्हायचे. प्रदीप ला चांगले वर्तन नव्हते तो वारंवार भावाकडून पैसे मागायचा. मनोज ने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला,पण त्याचे वर्तन सुधारले नाही त्यामुळे मनोज ने कंटाळून आपल्या लहान भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला