मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (10:16 IST)

आता घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार,दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाची बंपर लॉटरी

घर घेण्याचं स्वप्न सगळ्यांचेच असतात. आपल्याला देखील घर घेण्याची इच्छा असल्यास आपली स्वप्ने पूर्ण होणार या साठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणे गृह निर्माण आणि  म्हाडाच्या वतीने 3 हजार पेक्षा जास्त घरांची बंपर लॉटरी काढण्यात येत आहे.त्यामुळे आता आर्थिक दुर्बल घटकातील लोकांची घर घेण्याची स्वप्ने पूर्ण होणार. या कोरोनामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी म्हाडाने पुढाकार घेऊन लोकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लॉटरी पद्धतीने घर देणार.या मध्ये सरकारने काढलेल्या कायद्याची अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून सर्व सामान्यांना 20 टक्के घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहे.  एकाच वर्षात लॉटरी पद्धतीने घर देण्याची ही तिसरी खेप आहे. या मुळे लोकांमध्ये दिवाळीच्या वेळेस निघणाऱ्या या घराची लॉटरी ला घेऊन खूप उत्सुकता आहे. 

या पूर्वी जानेवारी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडाने 5 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढली याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.त्या नंतर गुडी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर देखील पुणे, पिंपरी, चिंचवड, सांगली, सातारा,सोलापूर, कोल्हापूर  जिल्ह्यात अडीच हजार घराची सोडत काढली आणि आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हाडा लॉटरी पद्धतीने 3 हजार पेक्षा जास्त घरांची सोडत काढत आहे. या मुळे नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह आहे.