रिक्षात विसरली 3 लाखाची रोकड व 55 हजारांच्या साड्या, डेक्कन पोलिसांनी घेतला तात्काळ शोध

pune police
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)
लग्नाची खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबाची तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि 55 हजारांच्या साड्यांची बॅग रिक्षात विसरली .खरेदी केलेले सामान आणि रोख रक्कम गेल्याने कुटुंबाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर डेक्कन पोलिसांनी

तात्काळ रिक्षा चालकाचा शोध घेऊन रिक्षात विसरलेले सामान आणि रोख रक्कम कुटुंबाच्या स्वाधिन केले.
विश्वजीत दिलीपराव पवार आणि त्यांचे मित्र पंकज माणिकराव जमदाडे (रा. मणेराजुरी ता. तासगाव, जि. सांगली) हे लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी
पुण्यात आले होते. खरेदी केल्यानंतर जंगली महाराज रोड येथील हॉटेल शिवसागर येथे कुटुंबासोबत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. हॉटेलमध्ये जाताना त्यांची तीन लाख रुपये असलेली पैशाची बॅग आणि 55 हजार रुपयांच्या साड्यांची बॅग
रिक्षात विसरली.

विश्वजीत पवार यांनी रात्री 8 वाजात त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाकडे
तक्रार देली. डेक्कन पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्डे
व महेश तांबे
यांनी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा क्रमांक मिळवला. नाकाबंदी अ‍ॅप वरुन रिक्षाचालकाचे नाव व पत्ता घेतला असता रिक्षा चालक सुदेश घोलप (रा. गणेश मंदिर, घोरपडी बाजार) असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालक राहत असलेल्या ठिकाणी जाऊन सुदेश घोलप यांच्याकडून रिक्षात विसरलेल्या साड्या व रोख रक्कम ताब्यात घेतली.हे सर्व सामान डेक्कन पोलीस ठाण्यात आणून रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पावसे यांच्याहस्ते तक्रारदार यांच्याकडे देण्यात आले.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी झाला होता हल्ला
एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी सुजवान ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने राखीव; श्रीलंकेसारखी परिस्थिती
पाकिस्तानात निजाम बदलल्यानंतरही ना राजकीय परिस्थिती स्थिर होतेय ना आर्थिक संकट थांबण्याचे ...

खासदार नवनीत राणा यांना "...मारण्यासाठी", धमकी; दिल्लीत ...

खासदार नवनीत राणा यांना
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या वैयक्तिक फोनवरून सतत अपमानाच्या आणि जीवे मारण्याच्या ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, आदेश - पोलिसांनी त्रास देऊ नये
नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या ...

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या 20 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB)च्या 20 व्या वार्षिक ...