रविवार, 13 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 9 एप्रिल 2025 (18:59 IST)

पुण्यात सुप्रिया सुळे यांचे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील नसरपूर ते बाणेश्वर मंदिरापर्यंतचा 1.5 किमीचा मार्ग अत्यंत वाईट अवस्थेत आहे परंतु प्रशासन त्याच्या दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष देत नाही.रस्ता दुरुस्तीसाठी त्यांनी आज धरणे आंदोलन केले.
श्री क्षेत्र बाणेश्वर गावातील काही लोकांसह सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या. दुपारीही निदर्शने सुरूच राहिली.
 
त्यांनी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही नवीन रस्त्याची मागणी करत नाही आहोत. आम्ही फक्त मंदिराकडे जाणारा सध्याचा रस्ता खड्डे असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत आहोत."

या भागाचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनंती करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा त्यांनी केला.स्थानिक लोकांनी वारंवार तक्रारी करूनही जेव्हा सरकार आणि प्रशासनाने या समस्येची दखल घेतली नाही, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी निषेध करण्यास सुरुवात केली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या समस्येबाबत त्यांनी अनेक वेळा अधिकारी आणि सरकारी लोकांशी बोललो आहे. यासाठी, आम्हाला त्यांच्याकडून आश्वासनही मिळाले की निषेधाची गरज नाही, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला जाईल. पण आजही रस्ता तसाच आहे.
प्रशासनाला वारंवार विनंती करून कंटाळून आम्ही येथे निषेध करण्याचा निर्णय घेतला," असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 
त्यांनी सांगितले की, या भागात 900 कोटी रुपयांचे रस्ते विकास काम प्रस्तावित आहे. "आम्ही त्याचे स्वागत करतो," कामाला दोन ते तीन वर्षे लागणार असल्याने, आमची विनंती आहे की किमान खड्डे तरी भरले पाहिजेत.”असे त्या म्हणाल्या.
 
जो पर्यंत बनेश्वर रस्त्याचा विषयावर प्रशासन ठोस भूमिका घेणार नाही जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असे त्या म्हणाल्या. 
Edited By - Priya Dixit