पुण्यातील पाटण दरड दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी६ जुलै रोजी पहाटे एका घरावर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडलीपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात तिकोणे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून बचाव कार्यात तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
या अपघातात तिकोणे कुटुंबातील नंदू दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता नंदू तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर नंदू तिकोणे हे मृत्युमुखी झाले आहेत.
ज्ञानेश्वर तिकोणे यांचा गेल्या वर्षीच विवाह झाला असून त्यांची पत्नी बाहेर गावी गेल्यामुळे त्या बचावल्या.
घटनेची माहिती मिळतातच मावळचे तहसीलदार अग्निशमनदलाचे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर बचावकार्य राबविले. या शोध मोहिमेनंतर तिकोणे कुटुंबातील मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. गावात शोककळा पसरली.
Edited By - Priya Dixit
