रविवार, 15 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (18:19 IST)

उद्धव ठाकरेंची अमित शहांना अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशंज म्हणत टीका

uddhav thackeray
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बालवाडीत त्यांची सभा होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्त्व सोडले आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे गटाची सभा झाली त्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज पुण्यात आले होते ते अहमद शहा होते हे अमित शहा आहे.

मी या पुढे अमित शहांना अहमद शाह अब्दालीचं  म्हणणार. मला ठाकरेंचे नकली वारस म्हणताना तुम्हाला लाज वाटली नाही. मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुम्ही तरी विचार केला का? मग तुम्ही अहमदशाह अब्दाली आहेत मला हे बोलायला भीती वाटत नाही. मी का घाबरू? 
 
इतिहास पहिला तर शाहिस्ताखान हा हुशार होता. तीन बोटे छाटल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला नाही. यांच्यात थोडी बुद्द्धी असती तर हे पुण्यात आले नसते. ते पुण्यात परत का आले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर जहरी टीका केली आहे. 
 
नवाझ शरीफ यांचा केक खाणाऱ्यांकडून हिंदुत्व शिकायचे का? ते म्हणाले की, शिवसेनेने हिंदू धर्म सोडला आहे. आम्ही हिंदू धर्म सोडलेला नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे देशद्रोही हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Edited by - Priya Dixit