शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (15:07 IST)

अति हुशार बाई विमानतळावर अशी करत होती सोन्याची तस्करी

विमानतळावरही तस्करी करणारे काय आयडिया लढवतील याचा नेम नाही, त्यमुळे विमानतळावर नेहमीच विचित्र आणि धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक घटना राज्यात समोर आली आहे. यात बिझी असलेल्या स्थानिक पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न  केला आहे. याबाबत महिलेची पोलिसांनी चौकशी सुरू आहे. यात विशेष म्हणजे तिने सोन्याची पेस्ट करून तिनं औषधांच्या स्वरूपात आपल्या बॅगेतून ही तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला परदेशातून आली असून तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आढळल्याची माहिती आहे.
 
पुणे विमानतळावर अनधिकृतरित्या सोन्याची तस्करी करताना एका महिलेला पकडले असून, तिच्याकडे तब्बल 270 ग्रॅम सोन्याची पेस्ट सापडली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या पुणे-बँकॉक या आंतरराष्ट्रीय विमानाने ही महिला पुण्यात आली होती. कस्टमच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या तस्करीबाबत विभागाला गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्पाईस जेट कंपनीचे पुणे-बँकॉक विमान पुणे विमानतळावर आल्यावर संशयित महिलेची तपासणी करण्यात आली. तिच्याकडे 270 ग्रॅम सोन्याची पेस्ट आढळली आहे.  ही सोन्याची पेस्ट औषधाच्या गोळ्यांच्या कॅप्सुल स्वरूपात होती.
 
यात प्रथमिक सखोल तपासणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मुळची दिल्लीची आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच पुणे-बँकॉक  या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे  उदघाटन करण्यात आले आहे. ही विमानसेवा पुणेकरांना थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता यावा या करिता सुरू करण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी या सेवेचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor
photo: symbolic