शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:27 IST)

कामाला जात नाही म्हणून काठीने झोडपून पत्नीची हत्या

कामाला जात नाही या कारणावरून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीला जीवे मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (दि.07) दुपारी तीनच्या सुमारास डावजे,ता.मुळशी याठिकाणी हा प्रकार घडला होता.हा प्रकार आता उघड झाला आहे. 

याप्रकरणी महिलेचा पती परशुराम शांताराम पवार याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन किसन जाधव (वय 30, रा.जातेड,मुळशी) यांनी गुरुवारी (दि.08) याबाबत पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी पतीने पत्नीला कामाला जात नाही या कारणावरून काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केला आहे. पौड पोलीस अधिक तपास करत आहेत.