शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (12:34 IST)

पुण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला मुठा नदीपात्रात अडकल्या

Pune
आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाखालील मुठा नदी पात्रात काही महिला आणि नागरिक कपडे धुण्यासाठी रविवारी गेल्या होत्या. जलसंपदा विभागा कडून रविवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाण्याचे विसर्ग वाढवण्यात आले.
एकाएकी नदीपात्रात पाण्याचा स्तर वाढला आणि या नदी पात्रात 4 ते 5 नागरिक अडकून गेले. याची माहिती जलसंपदा विभागाला देण्यात आली नंतर विसर्ग कमी केल्यामुळे त्यांची सुखरूप सुटका झाली. 
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात वाण्याच्या विसर्ग सुरु होता तीन वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे धरणासमोरील नदी पात्रात खडकांवर कपडे धुणाऱ्या महिला आणि 4 ते 5 नागरिक अडकले. पाण्याचा प्रवाह वाढलेला पाहून त्यांनी आरडाओरड करण्यास सुरु केले.
आणि जवळच्या खडकाचा आधार घेत स्वतःला वाचवू लागले. पाण्यात अडकलेल्या या महिलांचा आणि नागरिकांचा व्हिडीओ काही लोकांनी सोशल मीडियावर टाकला. याची माहिती उत्तम नगर पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रेस्क्यू करून पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. 
Edited By - Priya Dixit