शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (23:23 IST)

भुशी डॅम मध्ये तरुण बुडाला

सध्या राज्यात पावसाने जोर धरला आहे. पावसाचा हंगाम असल्यामुळे लोक सहलीसाठी पर्यटनस्थळी जात आहे. सध्या लोणावळा आणि खंडाळा पर्यटकांनी गजबजले आहे. लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या राज्यात सर्व डॅम ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असता लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम मध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.साहिल सरोज(19 रा.मुबई ) असे या मयत तरुणाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल आणि त्याच्या गटातील 250 पेक्षा अधिक सहकारी लोणावळ्यातील भुशी डॅमला वर्षाविहारासाठी आले होते. भुशी डॅमच्या धबधब्यात साहिल भिजत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला आणि सुमारे 25 ते 30 फूट उंचीवरून वाहत जाऊन बॅक वॉटर मध्ये बुडाला. या घटनेची माहिती मिळतातच लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने  घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध घेत आहे.अद्याप शोध मोहीम सुरु आहे.