सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (20:47 IST)

म्हणून पुणे शहरात तीन दिवस पाणीकपात रद्द

water draught
आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तीन दिवस पाणीकपात  रद्द करण्यात आली आहे. 8 ते 11 जुलै दरम्यान शहरात दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीच्या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. नुकताच पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला होता. आता 4 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंतचे वेळापत्रकही महापालिकेने ठरवले होते. मात्र रविवारी (ता. 10) आषाढी एकादशी तसेच बकरी ईद असल्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाणीकपात होणार नाही.