सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (13:59 IST)

ज्‍येष्‍ठ समाजसेवक प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली

prakash amte
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना  ‘हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. त्यांना न्यूमोनिया असल्याचे देखील समजले आहे. त्यांच्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी हाती त्यांचा मुलाने अनिकेत आमटे यांनी दिली. 
 
अनिकेत आमटे यांनी अभ्यागतांना प्रवेश नाकारला असून डॉक्टरांकडून डॉ. प्रकाश आमटे यांच्या आरोग्याबाबत चौकशी  करू नये. तसेच रुग्णालयात भेट देत असल्यास आपल्या शुभेच्छा आणि आपले नाव रुग्णालयाच्या रजिस्टरवर नोंदवावे. असे आवाहन आणि सूचना दिल्या आहेत.