सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:19 IST)

आप पंजाबमध्ये विजयाच्या दिशेने, केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला

bhagwant man arvind kejriwal
Punjab Election Results 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टी प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत म्हटले की - "या क्रांतीसाठी पंजाबच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन." भगवंत मान यांना पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते.
 
त्याचवेळी पंजाबमधील आप सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी सांगितले की, पंजाबने हे सिद्ध केले आहे की त्यांना अरविंद केजरीवाल-भगवंत मान जोडी आवडते, कोणत्याही पक्षाची जोडी नाही.
 
आप आमदार म्हणाले- "पंजाब यापुढे 'उडता पंजाब' म्हणून ओळखला जाणार नाही तर 'उत्तर पंजाब' म्हणून ओळखला जाईल. याचे सर्व श्रेय 'आप' कार्यकर्त्यांना जाते. त्यांनी दिवस- रात्र, उन्हाळा - हिवाळा बघितला नाही आणि पक्षासाठी काम सुरू ठेवले.
 
 
पंजाबच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस- 18, आप 90, एसएडी 6, भाजप आघाडी 2 आणि इतरांवर आघाडीवर आहे.