निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता सोनू सूदवर गुन्हा दाखल  
					
										
                                       
                  
                  				  बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्यावर 20 फेब्रुवारी रोजी पंजाब निवडणुकीच्या मतदानादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	निवडणूक आयोगाने रविवारी अभिनेता सोनू सूदला मोगा येथील मतदान केंद्रावर जाण्यास मनाई केली कारण त्यांच्यावर मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप होता. नंतर आयोगाने हे पाऊल उचलले. सूद यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सूद यांची बहीण मोगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.