शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:56 IST)

चन्नी गरीब असतील तर देशात कोणी गरीब नाही: कॅप्टन अमरिंदर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले की ते काँग्रेस पक्षाला पराभूत करण्यासाठी इलेक्शन लढवत नाहीये. ते म्हणाले की मी गेली 50 वर्षे पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये काम करत आहे. आता त्यांना माझी गरज उरली नाही. अशात आता मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल. यामुळे मी पंजाब लोक काँग्रेस हा माझा नवा पक्ष स्थापन केला आणि भाजपसोबत युती केली.
 
कॅप्टन अमरिंदर म्हणाले की काँग्रेसचा माझ्यावर विश्वास नाही पण आता पंजाबमध्ये आम्हीच सरकार स्थापन करू. 
 
चन्नी यांच्यावर कॅप्टन म्हणाले की चन्नी गरीब मुख्यमंत्री नाही. ते म्हणाले की चन्नी गरीब असतील तर देशात कोणीच गरीब नाही. त्यांनी सीएम चन्नी यांच्याकडे 170 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा केला.