शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

टोमॅटो ऑम्लेट

टोमॅटो ऑम्लेट
ND
साहित्य : चण्याचे पीठ 2 वाट्या, एक मोठा चमचा टोमॅटो, तीन-चार हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, लसणीच्या पाच-सहा पाकळ्या, जिरे, मीठ, कोथिंबीर, तेल.

कृती : मिरच्या, आले व लसूण वाटून घ्यावी. टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधून काढून घ्यावे व वाटलेल्या गोळ्यात घालावा आणि हे मिश्रण चण्याच्या पिठात घालावे. नंतर पिठात मीठ, जीरे, चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे तापलेले तेल घालून व पाणी घालून पीठ पातळसर भिजवावे व जाड तव्यावर तेल टाकून हे पीठ घालावे. हे पीठ चरा जाडच घालावे. वर झाकण ठेवावे.
ऑम्लेट खावयास देताना त्या सोबत लोणी द्यावे.