कृती : चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.
4-5 तासानंतर चिकनला एका सळईत ओवावे. दोन्ही तुकडे एक-दुसर्यापासून 1-2 इंचाच्या अंतरावर असावे. ओवनला 350 डिग्री फेरनहाइट वर गर्म करावे. त्यात 8-10 मिनिटासाठी चिकनला रोस्ट करावे.
चिकनला बाहेर काढून चारीबाजूने लोणी लावून परत 5 मिनिट लिंबु आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.