बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

दही-बटर

- प्रीता

दहीबटर
ND
साहित्य : बटर, गोड दही, मीठ, साखर, आले, ओल्या मिरच्या, सुक्या मिरच्या, दोन चमचे तूप, हिंग, जिरे, कढीलिंब, कोथिंबीर.

कृती : बटर गरम पाण्यात बुडवून काढावेत. गोड ताकात चवीपुरते मीठ व साखर घालावी व त्याच पाण्यात भिजवून घेतलेले बटर बुडवून एक तास भिजत ठेवावेत. बटर एकावर एक न घालता पसरून ठेवावेत. दही घुसळून घ्यावे. नंतर त्यात थोडे मीठ, थोडी साखर, आले, ओल्या मिरच्या वाटून घालाव्यात. तुपात हिंग, जिरे, सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून फोडणी करावी व दह्याला द्यावी.

नंतर खावयास देताना भिजत ठेवलेला बटर डिशमध्ये घालून त्याच्यावर वरील तयार केलेले दही व कोथिंबीर घालावी. हे बटर अगदी दहीवड्यासारखे दिसतात व चवीला तसेच लागतात.