कृती : सर्वप्रथम डाळींना स्वच्छ धुऊन शिजवून घ्याव्या. बीन्स, गाजर, कोबी तिघांचे लहान लहान तुकडे चिरून उकळून घ्यावे, त्यात मटाराचे दाणेसुद्धा टाकावे. बटाटे, वांगं, भेंडी, मिरच्या व आलं यांना बारीक बारीक चिरून तळून घ्यावे. एका भांड्यात 1 मोठा चमचा तूप गरम करून त्यात जिरं, लवंगा, कलमी व उकळलेल्या भाज्या परताव्या व त्यात तळलेल्या भाज्या टाकून एकजीव करावे व नंतर त्यात शिजवलेल्या डाळी टाकाव्या. जर आवश्यक असेल तर उकळलेल्या भाज्यांचे पाणी त्यात घालू शकतो. नंतर त्यात कोकम धुऊन, मिरच्या चिरून, गोडं लिंब, हळद, मीठ टाकून थोड्या वेळ उकळत ठेवावे. टोमॅटो बारीक चिरून घालावे व वरून कोथिंबीर टाकावी. सर्व्ह करताना 1 चमच्या तुपात तिखटाची फोडणी द्यावी. या कढीला भाताबरोबर खाव्यास द्यावे.