मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

'पंजाबी भरलेली' बाटी

पंजाबी भरलेली बाटी कणीक मटर बटाटे
ND
साहित्य : १ किलो कणीक (जाडसर), २ उकडलेले बटाटे, २५० ग्रॅम मटर उकडलेले, १ इंच आल्याचा तुकडा, ६-७ हिरव्या मिरच्या, २ चमचे तिखट, १ चमचा शोप, १/२ चमचा काळे मिरे, ५ ग्रॅम हिंग, १ चमचा गरम मसाला, ३० ग्रॅम मीठ.

कृती : सर्वप्रथम कणकेत 20 ग्रॅम मीठ, तूप किंवा तेल (मोहनासाठी) आणि एक चिमूट भर खाण्याचा सोडा घालून कणीक मळून घ्यावी. आलं, हिरवी मिरची बारीक कापावी. बटाटे मॅश करून त्यात सर्व मसाले घालावे. कणकेचे गोल गोल लाडू तयार करावे. त्याच्या मधोमध मसाला भरून बंद करावे. ओव्हनला आधी गरम करून घ्यावे. नंतर बाट्या शेकून घ्याव्या. सर्व्ह करताना तुपात बुडवून द्याव्या.