साहित्य : दीड वाटी बेसन, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कांदा, पाव वाटी स्फट खोपले, पाव वाटी ओले खोवलेले खोबरे, दीड वाटी नारळाचे दूध, पीठात पुरण भरण्यासाठी ओले खोपरे, थोडी खसखस, चवीसाठी मीठ व साखर बाजूला ठेवावे.
कृती : बेसन घेऊन त्यात 1 वाटी नारळाचे दूध घालून त्या दुधाला हळद मीठ व 1 चमचा गरम मसाला, धणेजिरेपूड व कांदा, खोबरे भाजून वाटून गोळी हे साहित्य घालून पीठ भिजवावे. गुठळी होऊ देऊ नये. तेच भांडे कुकर ठेवून वाफ द्यावी व नंतर एका ताटात उपडे करून त्यात पान ठेवून हाताला तेलाचा हात लावून सारखे पसरावे. त्यावर खसखस साखर पसरून पाना सकट गुंडाळी करावी. सर्व गुंडाळी झाल्यावर त्रिकोणी आकाराचे पीस कापावे गार झाल्यावर तूप किंवा तेल सोडून तळावेत या रुमाली वड्या दिसायला वेगळ्या व चवीला छान लागतात.