शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:46 IST)

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कोटा कमी, आता असे असेल गणित

राष्ट्रवादी काँग्रेसचे  दोन आमदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख आणि विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे आता मतदान करू शकणार नाहीत. यामुळे राज्यातील विजय उमेदवाराचा कोटा बदलला आहे.
 
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभेत मतदान करता यावं, या मागणीसाठीचा अर्ज कर्टात दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली असून ईडीच्या वकिलांनी मलिक आणि देशमुख यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने देशमुख-मलिकांना मतदानासाठी नकार देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यामुळे आता राज्याचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. म्हणजेच येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा 41 मतांची गरज आहे.
 
राज्यातील हे आहेत उमेदवार
 
भाजप- पीयूष गोयल, धनंजय महाडिक, डॉ. अनिल बोंडे
 
शिवसेना-संजय राऊत, संजय पवार
 
राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
 
काँग्रेस- कवी इम्रान प्रतापगढी