गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By वेबदुनिया|

रक्षाबंधनामागील शास्त्र काय ?

यमलहरींमुळे व पृथ्वीकणांमुळे संयोगाने पृथ्वीवर निर्माण होणार्‍या आच्छादनाचा, म्हणजे रक्षेचा आसुरी शक्‍तींना उपयोग होऊ नये, म्हणून त्यांचे स्त्री-शक्‍तीने पुरुषतत्त्वाच्या माध्यमातून केलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन. 

या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींच्या गतिमानतेतून निर्माण होणार्‍या घर्षणात्मक ऊर्जेतून वायुमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजकणांना पृथ्वीकणांच्या संयोगाने ज्या वेळी जडत्त्व प्राप्‍त होते, त्या वेळी हे कण भूमीवर आपले आच्छादन तयार करतात. यालाच `रक्षा' असे संबोधले जाते.

बलिराजा हा या रक्षेतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींचा आवश्यकतेप्रमाणे आसुरी शक्‍तींच्या पोषणासाठी उपयोग करून घेतो; म्हणून या दिवशी भूमीला आवाहन करून तिच्या साहाय्याने बलीला बंधन घालण्याचे प्रतीक म्हणून स्त्री-शक्‍ती कार्यमान पुरुषाला राखी बांधते, म्हणजेच रक्षारूपी कणांना ताब्यात ठेवून वायुमंडलाचे रक्षण करण्यासाठी विनवते. सर्वसमावेशक अशा तांदुळाच्या कणांचा समुच्चय हा राखीचे प्रतीक म्हणून कार्यमान पुरुषाच्या हातात बंधन म्हणून बांधला जातो.