रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By
Last Updated : शनिवार, 22 एप्रिल 2023 (14:52 IST)

Ramjan Eid Special शिरखुर्मा

sevai kheer
साहित्य-
अर्धा पाकिट बारीक शेवया
2 लीटर दूध
अर्धा कप साखर
1 चमचा वेलची पावडर
1 कप बदाम, काजू आणि पिस्ता
अर्धा कप फ्रेश साय
अर्धा चमचा केशर
अर्धा चमचा मनुका
अर्धा चमचा गुलाब पाणी
1 चमचा बटर
 
कृती
सर्वात आधी शेवया एका पॅनमध्ये बटर गरम करुन शेकून घ्या. आता यात साखर मिसळून उकळलेलं दूध घाला. हळू-हळू ढवळत राहा. घट्ट झाल्यावर त्यात सुके मेवे टाका. यात आवडीप्रमाणे गुलाब पाणी घाला. शेवटी साय घालून 10 मिनिट अजून शिजू द्या. शिजल्यावर वरुन केशर आणि वेलची पावडर टाकून सर्व्ह करा.