शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|

भारतीय बाजारात मंदी नाही - चिदंबरम

महागाईशी दोन हात करण्यासाठी सरकार सज्ज असून या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करतानाच योग्य वेळ आल्यानंतर आवश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यात येतील असे मत अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केले. सरकार संपूर्णपणे बाजारावर लक्ष केंद्रित करून असल्याचे ते म्हणाले.

महागाई वाढण्यापासून रोखण्यासाठी सरकारने अनेक वस्तूंची निर्यात रोखली असून, यामुळे बाजारात वस्तूंचे भाव स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे चिदंबरम म्हणाले.

जागतिक आर्थिक मंदी असतानाही भारताचा विकासदर सातत्याने वाढत असून, चालू आर्थिक वर्षात विकासदर सात ते आठ टक्क्यांवर पोहचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय बाजारात मंदीसारखे काही नसून, माध्यमांनी या शब्दाचा उपयोग करणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले.