बोस्टन अमेरिकेतील मंदीच्या आवर्तात आता आयटी क्षेत्रातील बडी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन (आयबीएम) सापडली आहे. मंदीचा फटका बसलेल्या या कंपनीने 2800 कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला आहे.
नवी दिल्ली- भारतीय निर्यात मंडळाने केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या आर्थिक पॅकेज बद्दल नाराजी व्यक्त केली असून, जर सरकारने याविषयी गांभीर्याने विचार केला नाही तर या क्षेत्रातील एक कोटी नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर पुढचे आर्थिक वर्ष जागतिक मंदीचे संकट अधिक गडद होण्‍याची शक्‍यता पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी व्‍यक्‍त केली आहे.
जागतिक मंदीमुळे भले भले हैराण झाले असले तरीही मध्यम वर्गीयांसाठी तरी सध्‍या मंदी वरदान ठरत आहे. कार निर्मिती करणा-या कंपन्‍यांनी कारच्‍या किंमतींमध्‍ये मोठी कपात केल्‍याने मध्‍यमवर्गीयांचा कार खरेदीकडचा ओघ वाढला आहे.
आर्थिक मंदीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. पगारामध्ये कपात किंवा नोकरी जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. मंदीमुळे उत्पन्न कमी होत असून पदोन्नतीही मिळत नाही. घरातील प्रमुख व्यक्ती
आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सरकारच्‍या या निर्णयामुळे सरकारला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे.
अमेरिकेतील आर्थिक संकटाला जितक्या अमेरिकी बँका जबाबदार आहेत, त्याच प्रमाणात अमेरिकी नॅसडॅकचे माजी अधिकारी आणि नॅसडॅक मार्केटचे माजी चेअरमन 70 वर्षीय बर्नाड मेडाफ यांचाही यात मोठा हातभार आहे.
आर्थिक मंदीच्‍या कारणांमुळे मागणी जोरदार घसरल्‍याने देशातील सर्वांत मोठ्या वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने जमशेदपूर वाहन प्रकल्‍पात चौथ्‍यांदा 'ब्लॉक क्लोजर'ची घोषणा केली आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्था पुर्णतः मोडकळीस येण्‍याचा धोका निर्माण झाला असल्‍याची माहिती अमेरिकेचे नवनिर्वाचित उपराष्ट्राध्‍यक्ष जो बिडन यांनी दिली आहे. एका मुलाखतीत बिडन यांनी मान्‍य केले आहे, की देशाची अर्थव्‍यवस्‍था आमच्‍या अपेक्षेपेक्षाही खराब झाली ...
नवी दिल्ली- जागतिक आर्थिक मंदीचा फटका अंबानींच्या रिलायन्स समूहालाही बसला असून, आगामी काळात रिलायन्स आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे वृत्त आहे.
बेंगलूरू- इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू इंडिया कंपनीलाही आर्थिक मंदीचा फटका बसला असून, कंपनीतही नोकर कपात सुरू झाली आहे.
न्यूयॉर्क अमेरिकेत आर्थिक मंदीने आता भयावह स्वरूप धारण केले आहे. अनेकांच्या नोकर्‍या या मंदीने गिळंकृत केल्या आहेत. या मंदीची नवी शिकार रसायन क्षेत्रातील अग्रणी डाऊ ही कंपनी बनली आहे.
टोकियो आतापर्यंत अमेरिका आणि युरोपमध्ये पसरलेली आर्थिक मंदी आता आशिया खंडातील कंपन्यांच्या दारावर येऊन धडकली आहे. याचा पहिला फटका सोनी या बड्या कंपनीला बसला असून कंपनीने आपल्या आठ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला आहे.
लंडन आर्थिक मंदीने लोकांना अडचणीत आणले असताना आगतिक झालेल्या लोकांनी आता परमेश्वराच्या दारी धाव घेतली आहे. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये येणार्‍या भाविकांची गर्दी कधी नव्हे ते अचानक वाढली आहे. चर्च ऑफ इंग्लंडनेच ही माहिती दिली आहे.
जागतिक मंदीच्‍या विळख्‍यात अडकलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला सावरण्‍यासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांच्‍या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत लहान उद्योगांना अनेक सवलती देण्‍यात येणार असून उद्योग सुरू करण्‍यासाठी 1 कोठी रुपयांपर्यंत ...
जमशेदपूर (झारखंड)- जागतिक आर्थिक संकट जगभरातील जवळपास सर्वच कंपन्यांना भेडसावत आहे. या काळात कंपन्यांमध्ये उत्पादन कमी झाल्याने कर्मचारी कपात करण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. अशातच पोलाद निर्मितीत महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलला मात्र ...
नवी दिल्ली- जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर आज पुन्हा जेट एअरवेजने आपल्या काही कर्मचाऱ्यांना नारळ दिले असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅरिस- अमेरिकेतील मेरिल लिंच कंपनीने वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांचा 50 टक्के बोनस कापण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
न्यूयॉर्क- जागतिक आर्थिक मंदीचा फटका मिडियालाही सहन करावा लागत असून, अमेरिकेतील मोठे दैनिक असलेल्या न्यूयॉर्क टाईम्सनेही आपल्या वितरण विभागातील 530 जणांना नारळ देण्याची घोषणा आज केल्याने खळबळ उडाली आहे.
जमशेदपूर (झारखंड)- जागतिक आर्थिक मंदीचा चांगलाच फटका टाटा उद्योगाला बसला असून, टाटांच्या जमशेदपूर येथील आणखी एका कंपनीत चार दिवसांसाठी ब्लॉक क्लोजर जाहीर करण्यात आल्याने उद्योग जगतात चिंतेचे वातावरण आहे.