मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|
Last Modified: शिलांग , रविवार, 4 जानेवारी 2009 (11:33 IST)

यंदाचे वर्ष आणखीनच अडचणीचेः पंतप्रधान

भारतीय अर्थव्यवस्थेवर पुढचे आर्थिक वर्ष जागतिक मंदीचे संकट अधिक गडद होण्‍याची शक्‍यता पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी व्‍यक्‍त केली आहे.

सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्‍यासाठी दुस-या बेल आऊट पॅकेजची घोषणा केल्‍यानंतर दुस-याच दिवशी पंतप्रधान म्‍हणाले, की जागतिक मंदीमुळे येत्या आर्थिक वर्षात देशासमोर अधिक गंभीर आव्‍हाने निर्माण होणार असून आपल्‍याला खूप मेहनत करावी लागणार आहे. असे असले तरीही आपण विकासाचा दर 7 टक्क्यांपर्यंत नेण्‍यास या वर्षात यशस्‍वी होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.