Last Modified: लखनऊ , शनिवार, 3 जानेवारी 2009 (17:05 IST)
मध्यमवर्गीयांचे कारचे स्वप्न साकार
जागतिक मंदीमुळे भले भले हैराण झाले असले तरीही मध्यम वर्गीयांसाठी तरी सध्या मंदी वरदान ठरत आहे. कार निर्मिती करणा-या कंपन्यांनी कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात केल्याने मध्यमवर्गीयांचा कार खरेदीकडचा ओघ वाढला आहे.
मंदीमुळे अनेक कार कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहेत. मारुती सुजुकीनेही आपल्या ब-याच कार मॉडेल्सच्या किंमतीत 15 ते 35 हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. तर ह्युंदई मोटर्सने सैन्ट्रोच्या किमतीत 38 हजार आणि आय-10 मध्ये 30 हजारांची कपात केली आहे.