बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वार्ता|

शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया वरची बंदी उठली

मुंबई उच्च न्यायालयाने आज अमेरिकेचे लेखक जेम्स लेन यांचे विवादीत पुस्तक शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया वरची महाराष्ट्र शासनाने लावलेली बंदी उठवली.

या आदेशाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाता यावे म्ह़णून हा आदेश सध्यातरी लागू करू नये ही महाराष्ट्र सरकारची विनंतीही न्यायाधीश एफ आई रिबेलो. वी के ताहिलरमानी व अभय ओक यांच्या खंडपीठाने नाकारली.

त्यानंतर उपमुख्यमंत्री आर आर पाटिल यांनी सांगितले की न्यायालयाच्या या निर्णयाविरूध्द आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन देऊ.

न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितले की सरकारने पुस्तकावर बंदी आणण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेत सांगितले होते की या पुस्तकामुळे काही विशिष्ठ समाजाच्या भावना दुखावतील व त्यामुळे वातावरण बिघडेल. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणी लेखक प्रकाशक व मुद्रक यांच्या विरूध्दच्या प्रकरणात अधिसूचना रद्द केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मते राज्य सरकारने सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्वत:हुन अधिसूचना परत घतली पाहिजे होती.

राज्य सरकारने 15 जानेवारी 2004 ला या पुस्तकावर बंदी आणली होती. या बंदीच्या निर्णयाला रिपब्लिकन कार्यकर्ता संघराज रुपवते. फिल्मकार आनंद पटवर्धन और सामाजिक कार्यकर्ता कुंदा प्रमिला यांनी आवाहन दिले होते.

पुस्तकात छत्रपति शिवाजी महराज यांच्या विरूध्द अपमानास्पद टिपण्या केल्या प्रकरणी पुण्यात संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत तोडफोड केली होती.