सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:32 IST)

‘..तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’; अजित पवारांचा इशारा

शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी  अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही. असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पीक विम्याबाबत प्रतिक्रिया दिली आणि विमा कंपन्यांना थेट इशारा दिला आहे.
 
त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, पुढे ते म्हणाले, आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाहीये. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला, कष्टक-याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे.असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.