सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:25 IST)

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं लातूर शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अपुऱ्या पावसामुळे लातूरमध्ये ऐन हिवाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळ्याचे दिवस शिल्लक असल्यानं पाणी टंचाईच्या झळा आणखी दाहक होणार आहेत. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी दर 10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाणी गळतीची समस्या कमी करण्यासाठीदेखील विशेष पावलं उचलण्यात येणार आहेत. 2016 मध्येही लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी या भागात ट्रेननं पाणी पुरवठा करण्यात आला होता.