विकासाचा रथ वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल
वडार समाजाच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली त्यांच्यातला बहुतांश समाज हलाखीत जगतो आहे हे दुर्दैव आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय विठ्ठलाचा रथ पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वडार समाजाशिवाय महाराष्ट्र पुढे कसा जाईल? असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
इंग्रजांनीही वडार समाजावर बंधने टाकली, मात्र वडार समाज आक्रमक राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून हा समाज समस्यांशी झुंजतो आहे. त्याच्या वेदना त्याची दुःखं दूर करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण सगळ्यांनी वडार समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बेघरांना घर देणार, वस्त्यांची जागा वडार समाजाच्या मालकीची होईल अशी व्यवस्था करू असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले