शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (18:25 IST)

नैराश्येतून १० च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

मुंबईतील चेंबूरमध्ये चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या  नैराश्येतून १० वीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता त्याने सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला लगेच खाली उतरवून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले.चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दबावाखाली येऊन आत्महत्या करु नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले आहे.