सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (16:40 IST)

झेडपी सदस्यांचा 100 कोटींचा भ्रष्टाचार, ईडी कडे चौकशीची मागणी

सध्या राज्यात ईडीच्या रडारवर अनेक नेत्यांची झडती सुरु आहे. ईडी भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत असे. राज्यातील गावा गावातील अनेक नेते देखील मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारात अडकले आहे. अशा परिस्थितीत बीडच्या नांदूरघाट झेडपी गटामध्ये विकासनिधीच्या रकमेत भाजपच्या सदस्याने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार केला आणि ईडीने यावर लक्ष द्यावे. अशी मागणी मनसेच्या बीड जिल्ह्याध्यक्षांनी केली आहे. यासाठी त्यांनी बॅनर लावून आपली मागणी पूर्ण केली आहे. त्यांच्या अशा बॅनर लावल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. 

केज तालुक्यातील नांदूरघाट जिल्हा परिषद येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी मागील पाच वर्षात विकासाची कामे करण्यासाठी शासनाने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक राशीचा निधी मंजूर केला. पण ही राशी विकास कामासाठी न वापरता यातून झालेल्या कामातून अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

या विकासनिधीच्या कामातून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ईडी कडून व्हावी ही मागणी आपल्या बॅनर च्या माध्यमातून केली आहे. तसेच या विकास निधीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार असे या बॅनरवर लिहिले आहे. सुमंत धस यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा जोरदार सुरु आहे.