सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (15:06 IST)

मटणाचा वाद विकोपाला वृद्धाला जाळले

वर्ध्यातील नांदपूर येथे मटणाच्या वादातून वृद्धाला ठार (old man was killed) केल्याची घटना उघडकीस आली आहे.यात वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आले आहे.
 
पोलीसांच्या माहितीवरून आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे मृतक अभिमान पखाले हे आरोपींच्या घरी राहायचे. रविवारी आरोपींच्या घरी मटणाची पार्टी करण्यात आली यात वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की दुसऱ्या दिवशी अभिमान पखाले यांना मारहाण करून त्यांना पेटवण्यात आले.याबाबत आर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सुभाष पखाले, बाल्या दहाट, मारुती पखाले यांना अटक करण्यात आली.
 
मटणाच्या पार्टीचा वाद विकोपाला गेला आणि मनात राग ठेवून वृद्धाला जाळण्यात आले की मारून जाळले हे अद्यापही कळले नाही. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेह शवविच्छेदन नेण्यात आले असून त्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे. मात्र मटणाच्या वादातून वृद्धाला ठार केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या घटनेचा तपास करत आहे.
 
प्रतिक्रीया –
मटणाची पार्टी करण्यात आला त्यात वाद झाला क्षुल्लक वादातून वृद्धाला ठार करण्यात आले.या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघाना अटक करण्यात आले आहे. भानुदास पिदूरकर – पोलीस निरीक्षक आर्वी