1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (09:25 IST)

१० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये होणार

10th and 12th exams
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात  सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसत आहे. सध्या देशात ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला जात आहे. तर ९ ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही राज्यांमध्ये सुरूवात झाली आहे. अशात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे परीक्षाही उशिरा होणार असल्याचं जाहीर केलं.
 
त्या म्हणाल्या की, कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता १० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून २५ टक्के अभ्यास क्रम कमी करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.