बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (07:56 IST)

१९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २ नोव्हेंबरला होणारी १९ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथे ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी दिली. ऊस परिषदेला मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली.
 
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘दरवर्षी ऊस हंगामाला सुरुवात होण्याअगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होते. दरम्यान यंदाच्या ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट आहे. ऊस परि षदेला परवानगी मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांसह  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी, शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा मेळावा व मुंबईतील शिवसेनेचा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाले. तुम्ही सामाजिक हिताचेच काम करताय. आणि त्या सामाजिक हिताला बाधा येऊ नये, अशी विनंती केली, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जालिदर पाटील यांनी सांगितले.