1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 (16:00 IST)

प्रशिक्षणासाठी भारतात आलेल्या भूतानच्या सैनिकाचा पचमढी येथे बुडून मृत्यू

water death
मध्य प्रदेशातील पचमढी येथे बुडून एका भूतान सैनिकाचा मृत्यू झाला आहे भूतान सैनिक पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी भारतात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण पचमढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रॉयल भूतान आर्मी (RBA) च्या एका 27 वर्षीय सैनिकाचा येथे मृत्यू झाला आहे. ट्रेनिंग सेंटर कॅम्पसमधील तलावात बुडून भूतान सैनिकाचा मृत्यू झाला.  
गुरुवारी एका पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भूतान आर्मीचे कॉन्स्टेबल शिवंग गेलसन हे 7 मे रोजी कॅम्पसमध्ये असलेल्या 'आर्मी म्युझिक विंग'मध्ये आले होते. ते पाच महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथे आले होते. या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "बुधवारी दुपारी अडीच वाजता जेवण केल्यानंतर गेलसन तलावाकडे गेला. येथे तो घसरला आणि त्यात बुडाला. गेलसनला लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
Edited By- Dhanashri Naik