मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (15:15 IST)

बिहार निवडणुकांच्या तारखा आज होणार जाहीर

बिहार विधानसभा निवडणुका 2020 च्या तारखांची आज घोषणा होऊ शकते. बिहार निवडणुका पाहता निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक आहे. या बैठकीनंतर निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा दुपारी 12:30च्या सुमारास पत्रकार परिषदेत करेल. निवडणूक आयोगाच्या अधिकृत प्रवक्त्या शेफाली शरण म्हणाले की, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद फक्त बिहार निवडणुकांबाबत असेल. कोरोना कालावधीनंतर बिहार विधानसभा निवडणुका म्हणून देशात पहिली निवडणूक होत आहे.

ऑक्टोबरमध्ये बिहारमधील 243-सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वे आणि सामाजिक अंतराचे नियम लक्षात घेऊन या वेळी बिहार विधानसभा निवडणुका एकापेक्षा अधिक टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोरोनामुळे बिहारमधील अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला यंदा निवडणूक पुढे ढकलण्याचे आवाहन केले.