शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (11:56 IST)

CoronaVirus : या सोप्या टिप्सने घरगुती कापड्यांना निर्जंतुक करावं

कोविड -19 टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या सावधगिरी बाळगल्या जात आहेत जेणे करून या विषाणूंची लागवणं होऊ नये. कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी स्वच्छतेवर जोर देण्यात येत आहे.
 
घराची स्वच्छता, वारंवार हात धुण्यासाठी, भाज्या आणि फळांना देखील सेनेटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण जर या विषाणूपासून वाचायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे आणि आपली एक छोटीशी चूक देखील मोठ्या संकटात टाकू शकते, म्हणून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.
 
या सह आपल्याला कापड्यांच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे. लहान सहानं गोष्टी लक्षात ठेवून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकारांच्या आजारांपासून वाचवू शकता.
 
आम्ही आपल्याला सांगत आहोत की कसं आपण कपड्यांना सेनेटाईझ करू शकता जेणे करून विषाणूंचा धोका होऊ नये.
 
कोरोना विषाणू आपल्या कपड्यांमध्ये देखील असू शकतो, म्हणून बाहेरून आल्यावर आपण आपल्या कपड्यांना सर्वप्रथम बदलून स्वच्छ कापडं घाला. नंतरच कुटुंबीयांचा संपर्कात या.
 
बाहेरून आल्यावर कपडे कुठेही लटकवून ठेवू नका, ते लवकरच धुऊन टाका किती ही वेळ झाला असल्यास तरी ही. आपल्या आळशीपणामुळे कोणते ही संकट उद्भवू शकतं.
 
कपड्यांना सेनेटाईझ करण्यासाठी त्यांना गरम पाण्यात साबणात किंवा डिटर्जेंट मध्ये भिजवून ठेवा.
 
या नंतर कपड्यांना ब्रशच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ करावं.
 
कपडे स्वच्छ केल्यावर त्यांना डेटॉलच्या पाण्यात एकदा टाकून काढावं.
 
कपड्यांना उन्हात चांगले कोरडे होऊ द्या नंतर इस्त्री करा.