शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:14 IST)

न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर ४ कोरोना रुग्ण सापडले

कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये १०२ दिवसानंतर ४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हे चारही रुग्ण ऑकलंड शहरात राहत असून, ते एकाच कुटुंबातील आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 
 
अर्डर्न म्हणाल्या, ऑकलंड हे न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. या शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळली. त्याची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्या घरातील ६ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
 
त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत या शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. त्या तीन दिवसात संपूर्ण आढावा घेण्यात येईल. तसेच माहिती संकलित करून या चौघांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचा शोध घेण्यात येईल. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत १५७०  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील १५२६  रुग्ण बरे झाले आहेत. २२ जण अजूनही उपचार घेत आहेत. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे.